जाहिरात करताना काय काळजी घ्यावी.

👀👇
मित्रहो हे महत्त्वाचं वाचा.
 
शेतकरी मित्रांना , आपल्या परिसरात काय काय विकायला आहे हे त्वरित कळावे. वेळ व पैशांची बचत व्हावी म्हणून आपले हे कामकाज चालत असते.
समजा आपल्या गाईला विक्रीसाठी बाजारात किती किंमत मिळू शकते हे आपल्याला माहिती नसते. आणि बाजारात न्यायची म्हणले तर प्रचंड खर्चिक आणि वेळ खाऊ गोष्ट असते.
परंतु आपल्या देवकर ॲग्रो माध्यमातून जाहिरात करून वेगवेगळ्या तालुक्यांत , गावांत , जिल्ह्यात जाहिरात केल्यामुळे मागणी च अंदाज येतो.. खर्च वाचतो.
आणि वेळही वाचतो.

👉मित्रहो आपण फक्त जाहिरात करतो... व्यवहारात अजिबात सहभाग घेत नाही.
कॉल रेकॉर्डिंग ठेवत चला.
विक्रेत्याच्या गावात विक्रेत्या विषयी चौकशी करा, म्हंनजे लबाड असेल तर कळेल.
व्यवहार करताना रोखच करा, विश्वास ठेऊ नये.
 गाड्या खरेदी करताना लोण, हप्ते इत्यादी महत्वाच्या बाबी चेक करा.
नोटरी, चेक, वीसार, उधार,  हप्ते भरणे, यावर स्वतःचा निर्णय घ्या.
 कांदा , घास बियाणे शक्यतो घरी जाऊन खरेदी करा. (घरी गेला तरी आधार कार्ड चेक करा, पत्ता बरोबर आहे का बघायला.)
गोड गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेऊ  नका.
👉 आमचा व्यवहाराशी संबंध नसतो.
👉 स्वताच्या जबाबदारीवर व्यवहार करावा.
ह्या जगात काही लोकांना व्यवस्थित  संस्कार दिले गेले नाही.फक्त ते पैदा झाले त्यांना समोरच्याला फसवणे या बद्दल काही वाटत नाही. त्यामुळे असल्या राक्षसी लोकांपासून सावध राहिले पाहिजे. 
आम्हाला ( देवकर ॲग्रो यांना) फसविणारे  सुद्धा खूप भेटतात दररोज.

विक्रेत्याच्या गावात 5 पेक्षा जास्त ठिकाणी त्याच्याबद्दल चौकशी करावी तेव्हाच व्यवहाराचा विचार करावा..

जाहिराती  साठी हा नंबर असतो.
  8007097094
Deokar agro📲
देवकर ॲग्रो
देवकर ॲग्रो
सकाळी 8 ते संध्या 5 या वेळेस विक्रीची जाहिरात देत जावी. कधी कधी काही अडचणी किंवा सिस्टीम प्रॉब्लेम मूळ कामकाज बंद राहते. परंतु असे जास्त घडत नाही. महिन्यातून एखाद्या वेळी असे होते.

Comments

Popular posts from this blog

फोटोवर क्लिक करा सर्व फोटो बघा

वरील फोटो वर क्लिक करून सर्व फोटो बघा